Mahedi Maud दारुलउलूम महेदविया के जानीब से आर्टिकल – माहे रमज़ान मुबारक – रोजा, खैरात, सदखा, फ़ितरा – क़ुरआन की रौशनी में, अपलोड किए हैं। - (पढ़ने के लिए क्लिक करें)Mahedi Maud
सुविचार

महेदविया बातमीपत्र (न्यूज) वाचा

अल्लाह च्या घराला (मशीद) तेच लोक बनवतात ज्यांना अल्लाह निवडतो...
- हजरत स.शाहेद मियाँ क़िबला.
बुधवार १८ मार्च, २०१५. ११:०० AM. औसा-(विशेष प्रतिनिधी):
    अल्लाह च्या घराला (मशीद) बनवणे, लोकयुक्त (आबाद) करणे आणि सदमार्गाकडे बोलवने व वाईटापासून रोखने ही मोमीन ची ओळख आहे. या विषयी सांगताना दायरा-ए-महेदविया मैंदर्गीचे पीठाधिपती (जानशीन) हजरत मियाँ सय्यद महेमूद शाहेद मियाँ साहब क़िबला यांनी फ़रमावले की, अल्लाह पाक आपल्या घराच्या बांधनीसाठी, स्थान, व्यक्ती व मार्ग आधीच निवडलेले असते. आणि त्याच लोकांकडुन आपले काम करून घेतो ज्यांना अल्लाह ने पसंत केलेले आहे.
    औसा शहरामध्ये मस्जीद-ए-महेदविया दायरा (मंडल) मैंदर्गी, नवीपेठ, महेदीपुर चा शुभारंभ बुधवार दि. २५/०२/२०१५ रोजी दुपारची प्रार्थना पार पाडल्या नंतर उपस्थित भक्तगनांशी संवाद करतांना हजरत सय्यद महेमूद शाहेद मियाँ साहब यांनी इतरांबद्दल मना मध्ये द्वेष ठेवणे, मत्सर व वाईट बोलण्यापासुन दुर राहण्यास फरमावले व पुढे सांगीतले की, इतराबद्दल वाईट बोलणे (गीबत) हा कॅन्सर पेक्षा जास्त भयंकर रोग आहे.
    प्रत्येक अवस्थेत ह्या रोगापासुन दुर राहण्याची शिक्षा दिली. उपरोक्त हजरतांनी मुहम्मद (सअस) यांच्या प्रेषितवाणीचे (हदिस) उदाहरण देऊन फरमावले की, “वरिष्ठांनी लहानांवर दया करावी व लहानांनी वरिष्ठांचा मान राखावा.”
    हजरत पीर व मुर्शीद शाहेद मियाँ साहब यांनी फरमावले की, “आपले धार्मिक व ऐहीक (दुनियावी) कर्म दुरुस्त करावे.” अल्लाह चे प्रेषित रसुल (सअस) यांची प्रेषितवाणी सादर करत फरमावले की, “जो व्यक्ति आपल्या प्रश्नांना व कर्मानां महत्व देत नाही तो मुसलमाना मधुन नाही.” ईमामुना महेदी माउद (अस) यांच्या फरमानचे उदाहरण देत फरमावले की, “मोमीन शरीयतचा पाबंद असतो.” पंचकाल प्रार्थना (पंचगाणा नमाज) व ईश्वर ध्यान (जिक्रुल्लाह) च्या पाबंदीवर जोर देत मुर्शिदना सय्यद शाहेद मियाँ क़ीबला यांनी फरमावले की, “प्रत्येक अवस्थेत ईश्वरध्यान चालू असावे.” अन्यथा प्रेषित मुहम्मद (सअस) यांच्या कथनानुसार “तो व्यक्ति मृत आहे ज्याच्या येणार्‍या व जाणार्‍या श्वासामध्ये ईश्वरध्यान नाही.”
    औसा शहारामध्ये जवळ जवळ तीन हजार (३०००) महेदवी मुसलमानांची लोकसंख्या आहे. ज्यामध्ये दायरा ह. सय्यद मुहम्मद गाजी (रअ) मैंदर्गीचे पीठाधिपती ह. मिया सय्यद खुंदमिर उर्फ बाशा मिया साहब कीबला व ह. सय्यद महेमूद शाहेद मियाँ साहब क़ीबला यांच्या अनुयायांची संख्या जवळ जवळ ८५% आहे. औसा शहरामध्ये या दायर्‍याची ही दुसरी मशीद आहे. हजरतांनी सर्व मोहल्ला वासीयांना मशिदीला लोकयुक्त (आबाद) करण्याची ताकीद फरमावली. व सर्व वरिष्ठांनां व नवयुवकांना व मुलांना संघटित होउन प्रार्थना (बाजमात नमाज) करण्याच्या पाबंदी वर जोर दिला.
    या मुहर्तावर शेकडो अनुयायी, भक्तगण उपस्थित होते. पुर्वीची तातपुर्ती मशीद लहान पडत असल्यामुळे आपली असमर्थता प्रकट करत होती. मशिदीच्या जिम्मेदारांनी अल्लाह वर विश्वास ठेवला आहे की, ज्या दानवीर व समर्थ लोकांना अल्लाह निवडेल त्यांच्या मार्फत आपल्या मशिदीचे काम करून घेईल.

No comments:

Post a Comment