Mahedi Maud दारुलउलूम महेदविया के जानीब से आर्टिकल – माहे रमज़ान मुबारक – रोजा, खैरात, सदखा, फ़ितरा – क़ुरआन की रौशनी में, अपलोड किए हैं। - (पढ़ने के लिए क्लिक करें)Mahedi Maud
सुविचार

Friday, 24 October 2014

दारूलउलूम महेदवीया जौंनपुर टु फराह. द युनीवरसीटी ऑफ इस्लाम.

not found not found

बंधु, बहिणी आणि जेष्ठ (श्रद्धेय), नमस्कार,
आमच्या वेबसाइट वर आपले हार्दिक स्वागत आहे.
not found
not found
    हे एक खाजगी संकेतस्थळ (वेबसाइट) आहे. महेदवी लोकांनी याला बनवले आहे. इस्लाम धर्माचे अनुपालन करणार्‍यांना, तसेच इस्लाम धर्माचे अनुपालन करण्याची इच्छा ठेवनार्‍यांना व इस्लाम व्यतिरिक्त इतर धर्माचे अनुपालन करणार्‍या लोकांना इस्लाम विषयी माहिती पोहोचविणे हे या संकेतस्थळाचे उद्धेश आहे.

    या संकेतस्थळावरुन इमाम महेदी माऊद (अस) यांनी दिलेल्या मार्गदर्शनानुसार इस्लाम विषयी मार्गदर्शन केले जाते. कुरानच्या आयती (ओळी) त्यांचे खरे अर्थ (मानी), व अर्थातील गुप्त अर्थ (बातीन मानी) व या ओवीच्या अर्थाच्या उद्देशाचे ज्ञान (मानी मुराद-ईल्म) या वेबसाइट वरुन सांगीतले (पोहोचवीले) जाते. सोबतच वेगवेगळया प्रेषितवानींचे (हदीस नबवी) सखोल ज्ञान व त्यांचे अर्थ स्पष्टीकरणासह या वेबसाइट वरुन आपल्या पर्यन्त पोहोचविले जाते. तसेच प्रेषितांची सुन्नत (प्रत्यक्ष आचरण) चे खरे ज्ञान या वेबसाइट वरुन दिले जाते (पोहोचविले जाते).

    ज्याप्रमाणे हे ज्ञान इमाम महेदी माऊद (अस) यांनी त्यांच्या अनुयायांना श्रद्धेच्या प्रकाशात (नुरे इमान) दिले आहे, यांच्या मध्ये त्यांचे खलिफा (वारसदार) व सहाबा (रजी) (सोबती) आहेत. खलिफा व साहाबा (रजी) यांनी हे ज्ञान आपल्या लिहिलेल्या पुस्तकामध्ये लेखणीबद्ध करून जतन करून ठेवले आहे. 'दारूलऊलुम महेदविया' हे एक ज्ञानपीठ आहे, विद्यापीठ आहे व अस्तित्वात असलेल्या विश्वविद्यालयाप्रमाणे (यूनिवर्सिटी) ह्या दारूलऊलुमची कोणतीही वीट, दगडा पासुन बनवलेली इमारत अस्तित्वात नाही किंवा या इमारतीचे मजले अथवा स्तंभ नाहीत.

    आमचा दृढ ईमान (विश्वास) आहे की, जौंनपुर-उत्तरप्रदेश चे इमाम सय्यद मुहम्मद जौंनपुरी (अस) बिन अब्दुल्लाह उर्फ सय्यदखाँ (अस) हे आमचे गतकाळी होऊन गेलेले खरे इमाम आखरुज्जमा आहेत व ते खातीमुल अवलिया, खातीमूल विलायत मुहम्मदिया व खलीफतुल्लाह आहेत. महेदी माऊद (अस) यांना ईश्वरांने ज्ञान (ईल्म, उलुम) दिले व मार्गदर्शन (हिदायत) केले. महेदी माऊद (अस) यांनी ईश्वराकडुन कुरान, हदिस व सुन्नत प्रेषित मुहम्मद पैगंबर (सअस) यांचे ज्ञान प्राप्त केले, आयतीच्या अर्थाचे खुले ज्ञान (इल्म-जाहीर) व गुप्त ज्ञान (इल्म-बातीन) प्राप्त केले व त्याच अर्थाच्या उद्देशयाचे ज्ञान (मानी-मुराद) प्राप्त केले. ईश्वराकडून ज्ञान प्राप्त करून व मार्गदर्शनावर आचरण करून महेदी माऊद (अस) यांनी खरी ईश्वर भक्ति करून उच्च पदास पोहोचले व ईश्वरदर्शनास प्राप्त झाले.

    महेदी माउद (अस) हे गुप्तज्ञान व खुलेज्ञान, इस्लामी विद्या, इस्लामी मार्गदर्शनाचे केंद्र आहेत, खजाना, घर आहेत, ते विद्यापीठ आहेत, विश्वविद्यालय (यूनिवर्सिटी) आहेत, मदरसा आहेत, बैतुलऊलूम आहेत व ईश्वराच्या आज्ञेने त्यांनी या इस्लामी ज्ञानांना (विद्यांना) लोकांपर्यंत पोहोचवले व आपल्या पवित्र अनुयायांच्या, खलीफाच्या व सहाबाच्या ह्रदयामध्ये ही विद्या व ज्ञान स्थापीत केले व त्यांचे मार्गदर्शन केले. हे इस्लामीक मार्गदर्शन व ज्ञान प्राप्त करून त्यांचे खलीफा, सहाबा व खर्‍या अनुयायांनी त्यावर आचरण केले व त्यांना पण ईश्वरदर्शन (दीदार-ए-खुदा) प्राप्त झाले.

    खुल्फा सहाबा (रजी) यांनी आपल्या अनुयायांना या इस्लामी ज्ञानांचे मार्गदर्शन (हिदायत) केले व त्यांनी त्यांच्या अनुयायांना मार्गदर्शन केले अशाप्रकारे हे मार्गदर्शन पिढ्यां-न-पिढ्या (सिलसिला-दर-सिलसिला) व एका ह्रदया पासुन दुसर्‍या ह्रदयात (सिना-दर-सिना) प्रवेशीत केले गेले व आज ते उपस्थित असलेल्या खर्‍या महेदवी पीर व मुर्शिद यांच्या पर्यन्त पोहोंचले व हे खरे पीर व मुर्शिद हेच ह्या जमान्यामध्ये (काळामध्ये) खरे जिवंत चालते-बोलते दारूलऊलूम, विद्यापीठ, ज्ञानपीठ, मदरसा यूनिवर्सिटी, जामियाँ, इस्लामियाँ व बैतुलऊलूम आहेत व हेच खरे पीर व मुर्शिद या दारूलऊलूम चे जिवंत इमारती, दगड विटा, मजले व स्तंभ (खांब), (PILLAR) आहेत व संपूर्ण जगात जौंनपुर पासून फराह पर्यंत सर्वत्र पसरलेले आहेत. महेदी माउद (अस) यांनी इस्लामी मार्गदर्शनांची सुरुवात व लोकापर्यंत पोहोचवण्याचे (तबलीक) चे कार्य जौंनपुर (उ.प्र.-भारत) पासुन केली व संपुर्ण जगभर फिरले व प्रवास केला व शेवटी फराह (अफगाणिस्तान) येथे आपले मार्गदर्शन पूर्नत्वास नेले व तसे सांगीतले की मार्गदर्शन (हिदायत) पुर्ण झाली आहे. म्हणुन या काळात संपूर्ण जगात मार्गदर्शन पोहोंचले व त्यांचे अनुयायी सर्वत्र पसरले.

    विदयार्थी (तालिब) ह्या जिवंत विद्यापीठामध्ये प्रवेशीत होउन म्हणजे खरे पीर व मुर्शिद यांच्या सानीध्यात राहुन इस्लाम विषयी खरे ज्ञान प्राप्त करू शकतो व अल्लाहचा खरा मार्ग प्राप्त करू शकतो व ह्या पवित्र मार्गावर आचरण करून आपले इहलोक व परलोक सुधारून आपले जगणे यशस्वी बनवू शकतो. हे 'दारूलऊलुम महेदविया' एक पाऊल पुढे चालून इंटरनेट वर ऑनलाइन होऊन आपले पदार्पण केले आहे. जेणेकरून अल्लाहचे ज्ञान त्याचा मार्ग समाजातील गोरगरीब, दीनदुबळ्या, अशिक्षित, मासुम, भटकलेल्या, मजबुर, व असंयमी क्रूर शासक लोकापर्यंत पोहोचेल व ते पण मार्गदर्शित होतील व त्यांच्या पर्यन्त अल्लाहचा मार्ग, हिदायत, धर्म, दीन व त्यांचे नियम व कानून यांची माहिती पोहोचेल व त्यावर शुद्ध आचरण करून त्यांना पण ईश्वर दर्शनाचा लाभ पोहोचवु शकेल.

    हे 'दारूलऊलुम महेदविया' विद्यार्थ्याला कोणतीही व्यवसाइक पदवी (डिग्री) किंवा पदविका प्रदान करत नाही. ज्याप्रमाणे इतर विद्यापीठे व विश्वविद्यालये पदवी प्रदान करतात जसे की हफिज, आलीम, फाजील, कारी, मुफ्ती, इमाम मुअज्जिम ज्यांच्या मदतीने वरील सेवा देऊन अर्थाजन केले जाते व आपला उदरनिर्वाह चालवू शकतो. याउलट हे दारूलऊलुम महेदविया या संकेतस्थळाच्या वाचकाला महेदी माऊद (अस) च्या श्रद्धेच्या प्रकाशात (नुरे-इमान) मार्गदर्शन देऊन व गुप्तध्यान (जिक्र-ए-खफी) चे ज्ञान देऊन आपल्या अस्तित्वाचे (हस्ती) व आत्म्याचे (वजुद) दर्शन घडवते व इस्लाम मधील आपला काय दर्जा आहे? याचे ज्ञान देते. या दारूलऊलुम महेदवियाचा पाठक ह्या वेबसाइट वरील विषय वाचन करुन, सतसंगात राहून म्हणजे खर्‍या महेदवी, पीर व मुर्शिद यांच्या सानिध्यात (सोहबत-ए-सादिकीन) राहून त्याच्या मनामध्ये अशी भावना निर्माण झाली की त्यांने इस्लामचे खरे ज्ञान, खरी विद्या व मार्गदर्शन प्राप्त केले व तो या मार्गदर्शनावर आचरण करण्यास प्रेरित झाला व आचरण प्रत्यक्षात सुरू केले तर तो महेदवी (मार्गप्राप्त) आहे व त्याला अल्लाह ‘महेदवी’ ची पदवी प्रदान करतो, की तो मार्गप्राप्त आहे. जसे कुरानमध्ये आहे आणि अल्लाह सांगतो...

not found
not found

    ह्या वेबसाइट वरील विषय वाचना नंतर जर कोणाची भावना दुखावली, त्यांचे हदय व्याकुल झाले किंवा त्यांचे समाधान झाले नाही तर आम्हास त्याच्याबद्दल दुख होते व याबद्दल दयाळू वाचकांनी आम्हाला क्षमा करावी व आपल्या लघु शंका, प्रश्न विचारून आमचा मान राखावा.

    हि वेबसाइट कोण्या धर्मास माननार्‍या, पंथास, मजहब अथवा गटास माननार्‍या व्यक्तिच्या इमानाला, श्रधेला, विश्वासाला कमी करण्यासाठी बनवलेली नाही किंवा कोण्या पंथास, धर्मास वा गटास आमच्या पेक्षा कनिष्ठ दर्जाचे दाखवण्यासाठी बनवलेली नाही याचा उद्धेश फक्त ईश्वराची भक्ति व लोकांची सेवा घडवणे हाच आहे जेणेकरून अल्लाहचा सदमार्ग सर्वच लोकांपर्यंत पोहोचेल.

    आम्ही आपली विनंती, सुचना, सुझाव, सल्ला, चर्चा, यांची अपेक्षा करतो व वेबसाइट मधील उणिवा, चुका दाखवून द्याव्यात जेणेकरून वेबसाइट वरील लेख उत्तमोत्तम बनतील. लेखमधील शब्द, वाक्यरचना, व्याकरण व अनपेक्षित चुका व वाक्य यांच्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो व वाचकास झालेल्या त्रासाबद्दल आम्हास क्षमा करावी.

    प्रिय वाचक अल्पावधीतच आम्ही आमची वेबसाइट, www.darululoom maheddvia jaunpur to farah.com ला इंटरनेट वर प्रसारित करणार आहोत व त्या अगोदर आम्ही हा ब्लॉग बनवला आहे. जेणेकरून या वेबसाइट ची माहिती जनसामण्यास होईल.

    वेबसाइट पुर्णत्वास नेण्यासाठी व त्याचे यशस्वीपने प्रसारण करण्यासाठी आम्हाला आदरणीय वाचक, मित्र व जेष्ठ श्रद्धेय (बुजुर्ग) यांचे आशीर्वाद व मार्गदर्शनाची गरज आहे. जेणेकरून आम्ही आपणास उत्तमोत्तम व खरे मार्गदर्शन पोहोचवू शकू व महेदी माऊद (अस) यांची शिकवण आपल्यापर्यंत पोहोचवू शकू.
not found
not found